इंदोरी किल्ला | Indori Fort Information in Marathi

इंदोरी हा एक भू-किल्ला असून तो महाराष्ट्र राज्यामधील लोणावळा या हिल स्टेशनच्या जवळ तसेच पुण्याच्या उत्तरेस सुमारे ३६  किलोमीटर अंतरावर आहे. इंदोरी हा किल्ला समुद्र सपाटी पासून सुमारे १०३३ मीटर म्हणजे ३३८९ फुट उंचीवर आहे. इंदोरी हा किल्ला इंद्रायणी नदीच्या काठावर वससलेला आहे. इंद्रायणी हा किल्ला लष्कराच्या दृष्टीने महत्वाचा होता. या इंदोरी किल्लाच्या आजू बाजूंच्या प्रदेशावर लक्ष्य ठेवण्यासाठी इंदोरी हा किल्ला १७२० मध्ये मराठ्यांचे सरसेनापती खंडोजीराव येसाजीराव दाभाडे यांनी बांधला होता. इंदोरी किल्ला हा ट्रेकिंग च्या दृष्टीने अत्यंत सोपा आहे.

Footpaths leading to Indori Fort | इंदोरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटा 

मुंबई -पुणे रेल्वे महामार्गावर तळेगाव एक मोठे शहर आहे. या तळेगाव पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर इंद्रायणी नदी आहे. याच इंद्रायणी नदीवर दोन पूल आहेत. या पूलामधील डाव्या बाजूचा पूल इंदुरी गावामध्ये जातो. तर उजव्या बाजूचा पूल इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. 

मुंबई-पुणे या रेल्वे महामार्गावर तळेगाव एक मोठे शहर आहे या तळेगाव पासून पाच किलोमीटरच्या अंतरावर डाव्या बाजूस एक कमान उभारलेली आहे. या कमानापासून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात.

How to get to Indori Fort? | इंदोरी किल्ल्यावर कसे जायचे?

रेल्वे ने 

घोरावाडी रेल्वे स्टेशन हे इंदोरी किल्ल्यापासून जवळचे असून ते सुमारे ६.७ किलोमीटर अंतरावर आहे. 

तळेगाव दाभाडे हे रेल्वे स्टेशन सुद्धा इंदोरी किल्ल्या पासून जवळचे असून ते सुमारे ५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. 

लोणावळा रेल्वे स्टेशन हे मुख्य रेल्वे स्टेशन असून ते इंदोरी किल्ल्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. 

विमानाने 

या इंदोरी किल्ल्याचा जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते इंदोरी किल्ल्यापासून सुमारे ३९ किलोमतर अंतरावर आहे. या विमानतळापासून तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने इंदोरी किल्ल्यावर जावू शकता. 

Places to Visit at Indori Fort | इंदोरी किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे 

कजाई देवीचे मंदिर 

इंदोरी किल्ल्याच्या मधोमध कजाई देवीचे मंदिर आहे. 

इंदोरी किल्ल्यावरील तटबंदी 

इंदोरी किल्ल्याला तीन फुट रुंदीची तटबंदी आहे. तसेच या तटबंदीचा काही भाग दगडाने तर काही भाग विटांनी बांधलेला आहे. 

भंडारा डोंगर 

या भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज यांनी वास्तव केले होते, यामुळे या भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या विरुद्ध उजव्या बाजूला असणाऱ्या भक्तनिवासाजवळून एक पायवाट खाली उतरते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौद्धकालीन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत तुकाराम महाराज साधनेसाठी बसायचे. या लेण्यांमध्ये एका दगडात कोरलेला स्तूप आहे. या स्तूपावरून हि बौद्ध लेणी हिनयान कालिन असावीत. लेण्यांसमोर एक बारामासी पाण्याचे टाक आहे.

पश्चिम बुरूज 

इंदोरी किल्ल्याचा पश्चिम बुरुजावरून इंद्रायणी नदीचे पात्र आणि दुरवरचा प्रदेश दिसतो. 

FAQs

इंदुरी किल्ला तळेगावपासून किती दूर आहे?

इंदुरी किल्ला तळेगाव पासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर आहे.

Scroll to Top