पन्हाळा किल्ला | Panhala Fort Information in Marathi

पन्हाळा किल्ला महाराष्ट्रामधील कोल्हापूरच्या वायवेस असून तो कोल्हापूर पासून सुमारे २१.७ किलोमीटर अंतरावर आहे. होता. महाराष्ट्राच्या अंतर्भाग आणि कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पन्हाळा हा किल्ला  बांधला होता. पन्हाळा या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. पन्हाळा किल्ल्याचा घेर सुमारे २१ मेल इतका आहे. पन्हाळा या किल्ल्याला सुमारे १५ ते ३० फुट उंचीची तटबंदी आहे. तसेच या तटाची रुंदी हि सुमारे ५ फुट एवढी आहे. परंतु माऱ्याच्या टापुट येणारा जो विभाग आहे त्याची रुंदी सुमारे १५ फुट एवढी ठेवण्यात आलेली आहे. पन्हाळा या किल्ल्याच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेस कासारी आणि भोगावती या नद्या आहेत. 

Places to Visit on Panhala Fort | पन्हाळा किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे

राजवाडा 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई यांचा हा वाडा आहे. या वाड्यामधील देवघर बघण्यासारखे आहे. आज या राजवाड्या मध्ये नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे. 

सज्ज्याकोठी 

राजवाड्यापासून थोडे पुढे चालत गेल्यावर पुढे एक कोठी वजा इमारत दिसते. या सज्जा कोठी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची गुप्त खलबते चालत होते. 

राजदिंडी 

राजदिंडी हि एक पाऊल वाट आहे याच पाऊल वाटेने छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढयातून सुटले होते. राज दिंडी हि एकमेव वाट आहे जी विशाळ गडाला जाऊन मिळते. या राज दिंडी वाटेचे अंतर सुमारे ४५ मेल इतके आहे. 

अंबरखाना 

अंबरखाना हा पन्हाळा किल्ल्याचा पूर्वीचा बाल्लेकिल्ला होता. या अंबरखान्यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती अशा ती धान्यांच्या कोठाऱ्या आहेत. या कोठारी मध्ये  वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. या कोठाऱ्यां शिवाय  सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती. 

चार दरवाजा 

पन्हाळा गडावरील हा अत्यंत महत्वाचा दरवाजा आहे. इ. स १८४४ मध्ये इंग्रजांनी हा चार दरवाजा पडून टाकला होता. याच चार दरवाज्याच्या शेजारी शिवा काशीद यांचा पुतळा आहे. 

सोमाळे तलाव 

पन्हाळा किल्ल्याचा पेठेलगत एक मोठे तळे आहे. या तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. 

रामचंद्र पंत आमत्य यांची समाधी 

सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यावर दोन समध्य दिसतात. त्या समाधी मधील उजवीकडील रामचंद्र अमात्य यांची तर डावीकडील त्यांच्या पत्नीची समाधी आहे. 

रेडे महाल 

रेडे महल हा एक घोड्याचा पागा आहे. परंतु या रेडे महाल मध्ये नंतर जनावरे बांधण्यात आले. 

संभाजी मंदिर 

पन्हाळा किल्ल्यावर एक छोटीसी गढी आणि दरवाजा आहे. हि गढी म्हणजेच संभाजी महाराज यांचे मंदिर आहे. 

धर्म कोठी 

या संभाजी मंदिरा पुढेच धर्म कोठी आहे. या धर्म कोठी मध्ये सरकारातून धान्य आणून आणून येथे यथा योग्य दानधर्म करत असे.  

अंदरबाव 

पन्हाळा या किल्ल्यावर तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला एक तीन कमानीची तसेच काळ्या दगडांची वास्तु दिसते. सर्वात खालच्या मजल्यावर पाण्याची विहीर आहे. मधल्या मजल्यावर चांगली ऐेसपेस जागा आहे.  

महालक्ष्मीचे मंदिर 

राजवाड्यामधून बाहेर पडल्यानंतर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे मंदिर पन्हाळा किल्ल्यावरील प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर एक हजार वर्षापूर्वी बांधले असावे अशा अंदाज आहे. राजा भोज यांचे हे महालक्ष्मीचे मंदिर कुलदेवत होते. 

तीन दरवाजा 

पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिमेस हा तीन दरवाजा आहे. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. या तीन दरवाज्या मधूनच इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने यांनी अवघ्या ६० मावळ्यानिशी हा पन्हाळा  किल्ला जिंकला होता. 

बाजीप्रभू यांचा पुतळा

 एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

How to get to Panhala Fort? | पन्हाळा किल्ल्यावर कसे जायचे?

रेल्वे ने 

पन्हाळा किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कोल्हापूर या ठिकाणी आहे. कोल्हापूरचे रेल्वे स्थानक पन्हाळा किल्ल्यापासून सुमारे २०.५ किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर चे रेल्वे स्थानक इतर प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. 

रस्त्याने 

रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी पन्हाळ्याला पोहोचणे सोपे आहे. राज्य महामार्ग आणि डोंगराळ भागातील सुंदर रस्ते हा प्रवास अधिक आनंददायक बनवतात. कोल्हापूरपासून केवळ २० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा तसेच खासगी टॅक्सी सुविधा नियमित उपलब्ध असतात. स्वतःच्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी हा एक आनंददायी अनुभव असतो, कारण घनदाट हिरवळ, वळणदार घाट आणि निसर्ग सौंदर्य यामुळे प्रवास मनमोहक वाटतो.

A footpath leading to Panhala Fort | पन्हाळा गडावर जाण्यासाठी पाऊलवाट 

चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून “एस टी’ बसने किंवा खाजगी वाहनाने किल्ल्यावर जाता येते. हि वाट चार दरवाजामार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.

भेट देण्यासाठी सर्वात्तम काळ 

जून ते सप्टेंबर 

या महिन्यांमध्ये पाऊस असतो. आजूबाजूचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला असतो. 

ऑक्टोबर ते जानेवारी

या महिन्यांमध्ये कडाकाची थंडी असते. हिवाळा हा भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. 

फेब्रुवारी ते मे 

या महिन्यांमध्ये उन्हाळा असतो. या ऋतुमध्ये वातावरण उष्ण आणि दमट असते . त्यामुळे उन्हाळ्यामद्धे पन्हाळा किल्ल्यावर जाणे शक्यतो टाळावे. 

FAQs

पन्हाळगडाला वेढा देणारा कोण?

सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिल होता.

शिवाजी महाराजांनी पन्हाळा कधी जिंकला?

६ मार्च १६७३ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला.

पन्हाळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?

पन्हाळा तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे.

शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे सुटले?

१२ जुलै १६६० च्या वादळी रात्री, सिद्धी जौहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराज पन्हाळगडाहून निसटले आणि विशाळगडाकडे कूच केले.

पन्हाळ्यातील किल्ल्याचे नाव काय आहे?

पन्हाळा किल्ला पन्हाळगड आणि पन्हाळा या नावांनीही ओळखला जातो.


Scroll to Top