पुणे जिल्ह्यामधील मावळ प्रांतात असणारा विसापुर हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६६.६ किलोमीटर, तर मुंबई पासून सुमारे १०५ किलोमीटर अंतरावर आहे. विसापुर हा किल्ला १७१३ ते १७२० मध्ये मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. लोहगड किल्ल्याचे शत्रू पासून संरक्षण व्हावे म्हणून विसापुर हा किल्ला बांधला होता. विसापुर या किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव मळवली असून ते पुण्यापासून सुमारे ५८.५ किलोमीटर अंतरावर आहे. मळवली या गावामधूनच विसापुर किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. विसापुर किल्ल्याचा ट्रेक हा मध्यम ते कठीण पातळी मध्ये येतो. विसापुर किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची सुमारे १०८४ मीटर एवढी आहे.
How to reach Visapur Fort | विसापुर किल्ल्यावर कसे जावे?
मळवली हे गाव विसापुर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या मळवली गावपर्यंत आपण टॅक्सीने, रेल्वेने आणि खाजगी वाहनाने सुद्धा जावू शकतो. पुण्यापासून मळवली हे गाव सुमारे ५८.५ किलोमीटर आहे. पुण्यामधून तुम्ही खाजगी वाहनाने किंवा टॅक्सीने मळवली या गावापर्यंत तुम्ही जावू शकता. मळवली या गावामधूनच विसापुर किल्ल्याच्या ट्रेकला सुरवात होते. तसेच विसापुर किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन मळवली स्टेशन आहे. पुण्यातून तुम्ही रेल्वे ने सुद्धा येवू शकता.
विसापुर या किल्ल्यावरती आपण भाजे मार्गे सुद्धा जावू शकतो. भाजे गावातून विसापुर किल्लावरती जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिल्या वाटेने भाजे गावामधून गायमुख खिंडीपर्यंत जावे लागते या खिंडी पर्यंत येण्यासाठीच एक ते दोन तास लागतात. या खिंडी मधून एक वाट लोहगड किल्ल्यावरती जाते, तर दुसरी वाट विसापुर किल्ल्यावर जाते.
भाजे या गावाच्या शेजारी काही लेण्या आहेत. या लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडल्यानंतर एक पायवाट आहे, हि पायवाट जंगलाकडे जाते. दुसरी पायवाट जी आहे, या वाटेने चालत गेल्यास आपल्याला काही घरे दिसतात. या घरा शेजारी एक शिवमंदिर आहे. या मंदीरा पासून पुढे चालत गेल्यास आपण विसापुर किल्ल्यावरती पोहचवू शकतो. या वाटेने विसापुर किल्ल्यावरती जाण्यासाठी तीन ते चार तास लागतात. मळवली स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर एक्सप्रेस हायवे लागतो. या एक्सप्रेस हायवेच्या पलीकडे पाटण गाव लागते. या गावा मधून सुद्धा आपण विसापुर किल्ल्यावरती जावू शकतो.
Best time to visit Visapur Fort | विसापुर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात्तम काळ
विसापुर या किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महीने सर्वात्तम आहेत. कारण या महिन्यांमध्ये वातावरण प्रवास करण्यासाठी सुखद असते. पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते सेप्टेंबर या महिन्यांमध्ये धबधबे आणि हिरवळ पाहण्याची मजा येते. परंतु पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगची वाट निसरडी आणि धोकादायक बनवू शकते.
Things to see on Visapur Fort | गडावरील पाहण्यासारखे ठिकाण
विसापुर किल्ल्याच्या पायऱ्याने विसापुर किल्ल्याकडे जात असताना मारूतीचे एक मंदिर लागते. या मंदीरा शेजारीच दोन गुहा आहेत, या गुहेमद्धे चाळीस पन्नास जण सहज राहू शकतात. मात्र पावसाळ्यात गुहेमद्धे पानी साठते. विसापुर या किल्लावर काही पाण्याचे तळे आहेत. या गडाच्या पठारावर लांब तटबंदी पसरलेली आहे. या विसापुर किल्ल्यावरती एक मोठे जाते सुद्धा आहे. तसेच या विसापुर किल्ल्यावरती प्राचीन शिव मंदिर आहे आणि या शिवमंदीरा समोरच पाण्याचे मोठे तलाव आहे.
Visapur Fort History | इतिहास
विसापुर हा किल्ला १७१३ ते १७२० मध्ये मराठा सम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. लोहगड किल्ल्याचे संरक्षण व्हावे म्हणून विसापुर किल्ला बांधला होता. ४ मार्च १८१८ मध्ये ब्रिटिशांचा जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला होता. त्याने लोहगड जिंकला. ज्या दिवशी ब्रिटिशांनी विजापूर किल्ला जिंकला त्याच दिवशी मराठ्यांनी लोहगड सोडला होता.
Quick Tips for Visapur Fort Trek | विसापूर किल्ला थोडक्यात
राहाण्याची सोय
गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.
जेवणाची सोय
जेवणाची सोय स्वतः आपण करावी.
पाण्याची सोय
गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.





