कोकण मधील एक दिवसाच्या सहलीसाठी सर्वोत्तम पिकनिक स्पॉट्सची माहिती जाणून घ्या. सुंदर समुद्रकिनारे, किल्ले, धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणांसह कुटुंब व मित्रांसोबत आनंददायी ट्रिपसाठी योग्य ठिकाणे या ब्लॉगमध्ये पाहा.
उन्हाळा (मार्च ते मे)
उन्हाळ्यात कोकणात तापमान जास्त असते, पण समुद्रकिनाऱ्यांवर सकाळ आणि संध्याकाळी हवामान आनंददायी वाटते. या काळात हापूस आंबाचा हंगाम सुरू असतो, त्यामुळे आंबाप्रेमींसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.
पावसाळा (जून ते सप्टेंबर)
पावसाळ्यात कोकण पूर्णपणे हिरवागार बनतो. धबधबे, डोंगर आणि समुद्राचे दृश्य अतिशय सुंदर दिसते. आंबोली आणि इतर निसर्गरम्य ठिकाणे या काळात अधिक आकर्षक वाटतात. मात्र, मुसळधार पावसामुळे काही वेळा प्रवासात अडचणी येऊ शकतात.
हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)
ह ऋतु कोकणला भेट देण्यासाठी सर्वात्तम मानला जातो. या ऋतुमध्ये वातावरण थंड आणि आल्हाददायक असते. समुद्र किल्ल्यांवर फिरणे, पुढे स्पोर्ट्स आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी हा परफेक्ट सीझन आहे.
