कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनांची माहिती जाणून घ्या. सुंदर निळाशार समुद्र बीचेस, स्पोर्ट्स, शांत वातावरण आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणांचा संपूर्ण अनुभव या ब्लॉगमध्ये शोधा.
अलिबाग बीच
अलिबाग बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. काळ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी आणि ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यासाठी अलिबाग बीच प्रसिद्ध आहे. अलिबागच्या भरती आणि ओहोटीच्या वेळी चालत किंवा घोडा गाडीने जाता येते. पर्यटकांसाठी बनाना राईड्स, जेट स्की, बम्पी राईड्स आणि पॅरा मोटरिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
कोकण पद्धतीचे घरगुती जेवण आणि मासे हे अलिबाग बीच वर खाद्य संस्कृती मध्ये प्रसिद्ध आहे. अलिबागच्या बीचच्या किनाऱ्या जवळ अनेक कॉटेजेस, हॉटेल्स आणि बीच रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. अलिबागच्या या बीच वरून सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो.
दिवेआगार बीच
कोकण मधील दिवेआगार बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे १६७ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे १८७ किलोमीटर अंतरावर आहे. दिवेआगार बीच हा स्वछ, शांत आणि पांढरी वाळू यांच्यासाठी ओळखला जातो. या दिवेआगार बीच वर नारळ आणि पोफळीच्या बागा सुद्धा आहेत. तसेच या दिवेआगार बीचवर सुवर्ण गणेशाचे मंदिर सुद्धा आहेत. दिवेआगार बीच हा चार ते पाच किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे.
काशीद बीच
काशीद बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे १६८ किलोमीटर अंतरावर आहे.
या काशीद बीच वर पांढरीशुभ्र वाळू, निळाशार समुद्र आणि आजूबाजूला हिरवीगार वनराई यामुळे याला मिनी गोवा सुद्धा म्हंटले जाते. काशीद बीचला ३ किलोमीटरचा समुद्र लाभलेला आहे. या काशीद बीच वर जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, पॅरासेलिंग, आणि स्पीड बोट यांसारखे अनेक साहसी खेळ उपलब्ध आहेत.
गणपतीपुळे बीच
कोकण मधील गणपतीपुळे बीच हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळे बीचवरील पांढरी वाळू साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या गणपतीपुळे बीचवर सकाळी आणि संध्याकाळी फिरत असताना वेगवेगळया पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला मिळते तसेच सकाळची थंड हवा शांत समुद्र आणि पक्ष्यांचे किलबिलाट यांमुळे मन प्रसन्न होते. तसेच या गणपतीपुळे बीच वरुन सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. गणपतीपुळे बीच फोटोग्राफीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे बीचच्या जवळच गणपतीचे मंदिर आहे.
तारकर्ली बीच
तारकर्ली बीच हा कोणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे ३८९ किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्ली बीचवरील पाणी इतके स्वछ आहे की, तारकर्ली बीच वर आपल्याला वीस फुट खोल समुद्राचा तळ दिसतो. तारकर्ली बीच हा वॉटर स्पोर्ट्स साठी खुप लोकप्रिय आहे.
दापोली बीच
दापोली बीच हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे २०२ किलोमीटर अंतरावर आहे. दापोली बीच हा वॉटर स्पोर्ट्स साठी खूप प्रसिद्ध आहे. डॉल्फिन सफारीसाठी आणि अस्सल कोकम आणि जेवणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. दापोली मद्धे प्रसिद्ध बीच मध्ये लाडघर बीच, कार्दे बीच, मुरुड बीच आणि अंजर्ले बीच यांचा समावेश होतो. दापोलीमध्ये कोकणी खाद्यपदार्थांची खास चव अनुभवायला मिळते. ताजे मासे, सोलकढी, कोकम सरबत आणि आंब्याचे पदार्थ पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. येथे होमस्टे, रेसॉर्टस आणि हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
मुरुड बीच
मुरुड बीच हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे १७० आणि मुंबई पासून सुमारे ८५.८ किलोमीटर अंतरावर आहे. मुरुड बीच हा शांत आणि स्वछ समुद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मुरुड बीच हा काळ्या वाळूसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डॉल्फिन पाहण्यासाठी मुरुड बीच हा लोकप्रिय आहे. पॅरासेलिंग, बनाना बोट आणि जेट स्कीइंग यांसारख्या वॉटर स्पोर्ट्स साठी सुद्धा मुरुड बीच प्रसिद्ध आहे.
हरीहरेश्वर बीच
हरीहरेश्वर बीच हा सुंदर शांत समुद्रकिनारा आणि धार्मिक महत्व असलेला समुद्र किनारा आहे. याच हरीहरेश्वर बीचला दक्षिण काशी असेही म्हणतात. कारण या हरीहरेश्वर बीचच्या जवळच प्राचीन शिवमंदिर आहे. हरीहरेश्वर बीच पुण्यापासून सुमारे १७६ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे १९६ किलोमीटर अंतरावर आहे. या हरीहरेश्वर बीच वरती सूर्योदय आणि सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. भरतीच्या वेळी या हरीहरेश्वर बीच वरती जाऊ नये. या हरीहरेश्वर बीच वरती पर्यटक समुद्रकिनारी फेरफटका मारणे, फोटोग्राफी करणे, बोटिंग आणि कोकणी खाद्यपदार्थांचा आनंद घेणे पसंत करतात.
रेवदंडा बीच
रेवदंडा बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासुन सुमारे १५५ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ११० किलोमीटर अंतरावर आहे. रेवदंडा बीच हा स्वछ आणि कमी गर्दीचा आहे. तसेच हा बीच नारळाच्या आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेला आहे. या रेवदंडा बीच वरती रेवदंडा किल्ला आहे. हा किल्ला पोर्तुगीज यांच्या काळामधील आहे. या रेवदंडा बीच वरती सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. तसेच हा रेवदंडा बीच फोटोग्रापहीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
हरनाई बीच
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरनाई बीच असून तो पुण्यापासून सुमारे २०५ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे २३३ किलोमीटर अंतरावर आहे. नेसर्गिक सोंदर्य, स्वछ किनारे आणि शांत वातावरणामुळे हरनाई बीच पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या हरनाई बीचवर नारळ झाडांच्या रांगा आहेत. हरनाई बीच हा मासेमारी साठी ओळखला जातो. या बीच वरती सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात मासळीची लिलाव प्रकिया पहायला मिळते. या बीचच्या जवळच सुवर्णदुर्ग किल्ला आहे. बोटीने या सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ जाता येते. या हरनाई बीचवर सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. तसेच हा हरनाई बीच फोटोग्राफी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
श्रीवर्धन बीच
रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन बीच असून तो पुण्यापासून सुमारे १६५ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे १९३ किलोमीटर अंतरावर आहे. हा श्रीवर्धन बीच अतिशय सुंदर स्वछ आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या श्रीवर्धन बीच वरती लांब पर्यंत मऊ वाळू पसरलेली आहे. तसेच या बीच वरती नारळाची आणि सुपरीची झाडे सुद्धा आहेत. श्रीवर्धन गाव हे पेशव्यांचे मूळ गाव आहे. या श्रीवर्धन बीचवर फिरताना कोकणातील पारंपरिक घरे, स्थानिक बाजार आणि कोकण संस्कृतीचा अनुभव घेता येतो. या श्रीवर्धन बीचच्या जवळ ताजे समुद्री खाद्यपदार्थ पर्यटकांना विशेष आवडतात. या श्रीवर्धन बीच वरून सूर्योदय आणि सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. अनेक पर्यटक येथे समुद्रकिनारी फिरणे, फोटोग्राफी करणे, बोटिंग आणि शांत वातावरणात वेळ घालवणे पसंत करतात.
वेळास बीच
कोकणा मधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेळास बीच असून तो सुंदर आणि शांत समुद्र किनारा आहे. वेळास बीच हा कोकणातील नेसर्गिक सोंदर्य, स्वछ किनारा आणि कासव संवर्धनासाठी हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. वेळास बीचच्या जवळच घरांमध्ये होमस्टे सुविधा उपलब्ध आहे. यामुळेच स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक कोकणी जेवणाचा आनंद घेता येतो. वेळास बीच पुण्यापासून सुमारे १७७ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे २०९ किलोमीटर अंतरावर आहे.
वेळास गाव विशेषतः टर्टल फेस्टिव्हल मुळे ओळखले जाते. दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी या किनाऱ्यावर उबवली जातात आणि लहान कासवांना समुद्रात सोडण्याचा सुंदर अनुभव पर्यटकांना पाहायला मिळतो. हा सोहळा प्रामुख्याने फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान आयोजित केला जातो.
समुद्रकिनाऱ्यावर नारळ, सुपारी आणि काजूच्या झाडांच्या रांगा दिसतात. येथील स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि शांत वातावरणामुळे अनेक पर्यटक येथे आराम करण्यासाठी, फोटोग्राफीसाठी आणि निसर्ग अनुभवण्यासाठी येतात.
शिरोडा बीच
कोकण मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय आणि शांत समुद्र किनारा आहे. वेंगुर्ला आणि गोवा सीमेच्या जवळ शिरोडा बीच आहे. शिरोडा बीच स्वछ वाळू निळाशार समुद्र हिरव्यागार नारळाच्या झाडांमुळे पर्यटकांमध्ये हा बीच लोकप्रिय आहे. शिरोडा बीच हा ज्या पर्यटकांना गोंगाटापासून दूर जायचे असेल तर त्या पर्यटकांनी शिरोडा बीच वरती यावे. सकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर फिरणे आणि संध्याकाळी सुंदर सूर्यास्त पाहणे हा येथे खास अनुभव असतो. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंड वारा मनाला खूप शांतता देतो. शिरोडा बीच हा पुण्यापासून सुमारे ४०८ किलोमीटर आणि मुंबई पसून सुमारे ५११ किलोमीटर अंतरावर आहे.
देवबाग बीच
कोकण मधील देवबाग बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेला अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. स्वछ पाणी पांढरी मऊ वाळू आणि शांत वातावरणामुळे हा बीच पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. देवबाग बीच हा वॉटर स्पोर्ट्स साठी खूप प्रसिद्ध आहे. या बीच वरती स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बोट राईड, जेट स्की आणि डॉल्फिन सफारीचा आनंद घेता येतो.
देवबाग बीच वरील पाणी एवढे स्वछ आहे की समुद्रामधील रंगीबेरंगी मासे पहायला मिळतात. देवबाग येथे करली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहायला मिळतो. समुद्रकिनाऱ्या लगत नारळ आणि काजूच्या झाडांच्या रांगा दिसतात, ज्यामुळे परिसर अधिक सुंदर वाटतो. येथे अनेक होमस्टे आणि बीच रिसॉर्ट्स उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांना कोकणी आदरातिथ्य आणि पारंपरिक मालवणी जेवणाचा आनंद घेता येतो. ताजी सीफूड थाळी हे येथे खास आकर्षण मानले जाते.
किहीम बीच
किहीम बीच हा अलिबागच्या जवळच आहे.पुण्यापासून किहीम बीच हा सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. किहीम बीच हा स्वछ वाळू आणि नारळ झाडांच्या रांगा इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. किहीम बीच वरती फक्त वीकएंड लाच गर्दी असते, जर तुम्हाला गर्दीच्या वेळेला जायचे नसेल तर तुम्ही वीकएंड दिवस सोडून कोणत्याही दिवशी किहीम बीच वरती जावू शकता. किहीम बीच हा पक्षी निरीक्षणासाठी ओळखला जातो. येथे विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी आणि फुलपाखरे पाहायला मिळतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे एक खास ठिकाण मानले जाते. किहीम बीच वरती काही वॉटर स्पोर्ट्स आणि बोट राईड्स देखील उपलब्ध असतात. तसेच, येथे स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. ताजे मासे, सोलकढी आणि कोकम सरबत पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.
गुहागर बीच
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर बीच आहे. गुहागर बीच हा पुण्यापासून सुमारे २४० किलोमीटर आणि २७० किलोमीटर अंतरावर आहे. गुहागर बीचवरती पांढरी वाळू आणि नारळाची झाडे या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या गुहागर बीच वरती सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील केशरी आणि लाल रंग समुद्रावर पडताना खूप सुंदर दिसतात. या गुहागर बीच वरती व्याडेश्वर मंदिर आहे. गुहागरमध्ये कोकणी खाद्यपदार्थांची चवही खास आहे. ताजे मासे, सोलकढी, कोकम सरबत आणि घरगुती जेवण पर्यटकांना खूप आवडते. येथे काही होम स्टे रेसॉर्टस आणि हॉटेल्स उपलब्ध असल्यामुळे राहण्याची चांगली सोय आहे.
वेळनेश्वर बीच
वेळनेश्वर बीच हा रत्नगिरी जिल्ह्यामध्ये असून तो पुण्यापासून सुमारे ३२० किलोमीटर अंतरावर आहे.
कोकणातील गर्दीपासून दूर असलेला हा बीच आपल्या स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि नारळ-सुपारीच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. शांत वातावरणामुळे येथे पर्यटकांना रिलॅक्स आणि निवांत वेळ घालवता येतो. या बीचच्या जवळच वेळनेश्वर मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून ते शंकराचे आहे. येथे स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येतो. ताजे मासे, सोलकढी आणि घरगुती जेवण पर्यटकांना खूप आवडते. राहण्यासाठी काही होमस्टे आणि रेसॉर्टस उपलब्ध आहेत.
आरे वारे बीच
आरे वारे हा बीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून तो अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. हा बीच दोन भागामध्ये विभागाला आहे. हिरव्यागार डोंगररांगा, स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण यामुळे हा किनारा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आरे वारे बीच वरती गर्दी कमी असल्यामुळे शांतपणे वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.
आरे वारे बीच जवळ काही छोटे रेसॉर्टस आणि होम स्टे उपलब्ध आहेत, जिथे कोकणी खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येतो. ताजे मासे, सोलकढी आणि कोकम सरबत पर्यटकांना विशेष आवडते.
मुंडवा बीच
मुंबई पासून जवळच असलेला आणि अनेक बॉलीवूड पिक्चर मध्ये प्रदर्शित झालेला मुंडवा बीच हा पुण्यापासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई पासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर आहे. अलिबागपासून सुमारे १९ किलोमीटर अंतर असलेल्या मांडावा येथे जायला स्थानिक वाहतूक सुद्धा उपलब्ध आहे. मुंबईशी जोडले गेलेल्या या ठिकाणी सतत दिग्गज सिनेकलाकार उद्योगपती अशा बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींची ये जा सुरू असते.
