कोकण मधील सुंदर पिकनिक स्पॉट्सची माहिती जाणून घ्या. समुद्रकिनारे, धबधबे, किल्ले, हिल स्टेशन आणि निसर्गरम्य ठिकाणांसह कुटुंब, मित्र किंवा वन-डे ट्रिपसाठी योग्य पर्यटनस्थळांचा अनुभव या ब्लॉगमध्ये मिळवा. शांत वातावरण, हिरवागार निसर्ग आणि अविस्मरणीय सहलीसाठी कोकणातील सर्वोत्तम पिकनिक ठिकाणे शोधा.
गणपती पुळे बीच
गणपतीपुळे बीच हा रत्नागिरी जिल्हयामध्ये असून तो रत्नागिरी पासून सुमारे २६.४ किलोमीटर, पुण्यापासून सुमारे ३११ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ३३२ किलोमीटर अंतरावर आहे. गणपती पुळे बीच हा पांढऱ्या वाळूसाठी आणि गणपतीचे मंदिर म्हणजे तीर्थक्षेत्र याच्यासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे बीचच्या शेजारीच प्रसिद्ध गणपतीचे मंदिर आहे. हे गणपतीचे मंदिर नवसाला पावते. गणपतीपुळे बीच वर संध्याकाळी फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पर्यटकांना खूप आकर्षित करते. येथे पॅरासेलिंग, बोटिंग आणि घोडेस्वारी यांसारख्या काही वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजही उपलब्ध आहेत.
हरनाई बीच
हरनाई बीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून तो रत्नागिरी पासून सुमारे १४४ किलोमीटर पुण्यापासून सुमारे २०९ किलोमीटर आणि मुंबई पासून २२९ किलोमीटर अंतरावर आहे. हरनाई बीच हा शांत वातावरण, स्वच्छ वाळू आणि पारंपरिक कोकणी जीवनशैलीसाठी ओळखला जातो. समुद्राच्या निळाशार लाटा आणि थंड वारा पर्यटकांना खूप आकर्षित करतात.हरनाई बीच चे मुख्य आकर्षण म्हणजे हरनाई बीचवरील प्रसिद्ध मासळी बाजार सकाळी या हरनाई बीचवर मासेचा लिलाव आपल्याला पहायला मिळतो. या हरनाई बीचवर सुवर्णदुर्ग किल्ला आहे.
महाड
महाड हे कोकण मधील पर्यटन स्थळ रायगड जिल्ह्यामध्ये असून ते रायगड पासून सुमारे २६.३ किलोमिटर अंतरावर आहे. या महाड पासून जवळच स्वराज्याची राजधानी किंवा मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला आहे. तससेच या महाड जवळच अष्टविनायकांपैकी एक वरद विनायक मंदिर आहे. महाड हे पर्यटन स्थळ मुंबई आणि गोवा या महामार्गावर असल्यामुळे हे शहर कोकणातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते.पावसाळ्यात महाड परिसर हिरवागार आणि अतिशय सुंदर दिसतो. डोंगर, नद्या आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे कोकणी आणि महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची चवही अनुभवता येते.
अलिबाग
अलिबाग हे शहर रायगड जिल्ह्यामध्ये असून ते रायगड पासून सुमारे १०९ किलोमीटर पुण्यापासून सुमारे १३८ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ९८.८ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग हे मुंबई पासून जवळ असल्यामुळे याला मिनी मुंबई असेही म्हंटले जाते. या अलिबागच्या समुद्या किनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. अलिबाग बीच किहीम बीच नागांव बीच हे अलिबागमधील प्रसिद्ध बीच आहे. अलिबागच्या जवळच कोलाबा किल्ला आहे. अलिबाग मधील कोकणी आणि सीफूड पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. ताजे मासे, सोलकढी आणि कोकम सरबत पर्यटकांना खूप आवडते. या अलिबाग मध्ये होमस्टे रिसॉर्टस आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत.
मुरुड
रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड हे पर्यटन स्थळ असून रायगड पासून सुमारे ९५ किलोमीटर पुणे पासून सुमारे १६७ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे १५६ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रमधील अजिंक्य असणारा जंजीरा किल्ला हा मुरुड या शहारामध्येच आहे. मुरुड बीच हा शांत वातावरण आणि नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या मुरुड बीच वरून सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. मुरुड बीचवरती वॉटर स्पोर्ट्स सुद्धा प्रसिद्ध आहे. मुरुडमध्ये कोकणी खाद्यपदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत. ताजे मासे, सोलकढी आणि मालवणी पदार्थ पर्यटकांना खूप आवडतात. येथे रेसॉर्टस होम स्टे आणि हॉटेल्स उपलब्ध असल्यामुळे राहण्याची चांगली सोय आहे.
दापोली
दापोली हे पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून ते रत्नागिरी पासून सुमारे १३० किलोमिटर पुण्यापासून सुमारे २०२ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे२२२ किलोमीटर अंतरावर आहे . सह्याद्री पर्वत रांग आणि अरबी समुद्राच्या मधोमध दापोली हे पर्यटन स्थळ वसलेले आहे. दापोली या पर्यटन स्थळाला मिनी महाबळेश्वर असेही म्हंटले जाते. दापोली जवळ कार्दे बीच, लाडघर बीच, मुरुड बीच आणि अंजर्ले बीच इत्यादी प्रसिद्ध बीच आहेत. सुवर्णदुर्ग किल्ला आणि केशवराज मंदिर हे ऐतिहासिक वास्तु आणि धार्मिक स्थळे सुद्धा दापोली जवळ आहेत.
रोहा
रोहा हे पर्यटन स्थळ रायगड जिल्ह्यामध्ये असून ते रायगड पासून सुमारे ७० किलोमीटर पुण्यापासून सुमारे १४२ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ११५ किलोमीटर अंतरावर आहे. रोहा हे पर्यटन स्थळ कुंडलिका या नदीच्या काठावर वसलेले आहे. रोहा हे पर्यंत स्थळ मुंबई गोवा या महामार्गावर असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.रोहामध्ये शेती आणि उद्योग दोन्ही मोठ्या प्रमाणावर आहेत. तांदूळ, नारळ आणि आंबा शेती येथे केली जाते. तसेच, कोकणी संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभवही येथे घेता येतो.
आंबोली
आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून ते सिंधुदुर्ग पासून सुमारे 6२ किलोमीटर पुण्यापासून सुमारे ३४४ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ४८५ किलोमीटर अंतरावर आहे. आंबोली मधील आंबोली धबधबा प्रसुद्ध ठिकाण आहे. तसेच पावसाळ्यात हा धबधबा मोठ्या वेगाने वाहताना खूप सुंदर दिसतो. आंबोली मधून सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. येथे अनेक व्हीव पॉईंट्स आणि जंगल परिसर आहेत, जिथून सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि निसर्ग निरीक्षणासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. आंबोलीमध्ये स्थानिक मालवणी आणि कोकणी खाद्यपदार्थांची चवही अनुभवता येते. राहण्यासाठी रेसॉर्टस हॉटेल्स आणि होमस्टे सुद्धा उपलब्ध आहेत.
रत्नागिरी
रत्नागिरी हे कोकणमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे. रत्नागिरी हे शहर पुण्यापासून सुमारे २९७ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ३३४ किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म सुद्धा रत्नागिरी मध्ये झाला होता. गणपतीपुळे बीच, भाट्ये बीच, मांडवी बीच हे प्रसिद्ध बीच रत्नागिरी मध्ये आहेत. आणि रत्नदुर्ग किल्ला हा सुद्धा ऐतिहासिक प्रसिद्ध किल्ला रत्नागिरीमध्ये आहे. येथील कोकणी खाद्यपदार्थ पर्यटकांना खूप आवडतात. ताजे मासे, सोलकढी, कोकम सरबत आणि आंब्याचे पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. राहण्यासाठी रेसॉर्टस हॉटेल्स आणि होमस्टे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हे पर्यटन स्थळ पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. सिंधुदुर्ग मधील सिंधुदुर्ग किल्ला प्रसिद्ध आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. येथील तारकर्ली बीच, देवबाग बीच आणि मालवण बीच हे सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. येथे स्कूबा डायव्हिंग, स्नॅलिंग, बोटिंग आणि इतर स्पोर्ट्सचा आनंद घेताना. सिंधुर्ग हे मालवणी खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे. ताजे मासे, मालवणी मसाले, सोलकढी आणि कोकणी पदार्थ भोजनाला विशेष आवडले.
