वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून सुमारे ४२५० फूट उंचीवर आहे आणि तो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते. कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे असलेला वासोटा हा किल्ला सातारा शहरापासून सुमारे ३८ किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे १४८ किलोमीटर अंतरावर आहे. हा वासोटा किल्ला व्याघ्रगड या नावाने सुद्धा ओळखला जातो. वासोटा हा किल्ला जावळीच्या जंगला मध्ये बांधलेला आहे.
How to visit Vasota Fort | वासोटा किल्ल्यावर कसे जायचे?
बामनोली हे वासोटा किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. या बामनोली गावा मधूनच वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेक सुरू होतो. सातारा शहरामधून सुद्धा वासोटा किल्ल्यावर जाता येते. त्यासाठी सातारा शहरामधून बामनोली या गावी यावे लागते. सातारा ते बामनोली हे अंतर सुमारे ३० किलोमीटर आहे. सातारा शहरामधून बामनोली गावामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाची बसची सोय सुद्धा आहे. बामनोली पासून इंदविला जाण्यासाठी शिवसागर जलाशयामधील बोटीने जावे लागते. या इंदवीला गावामध्ये वन खात्याचे ऑफिस आहे. या वन खात्याच्या ऑफिस मध्ये पर्यटकांनी आणलेल्या प्रत्येक वस्तूवर सुमारे दहा रुपये डिपॉजिट द्यावे लागते. वनखात्याच्या ऑफिसच्या मागून जाणारी वाट गणपतीच्या मंदिराकडे घेऊन जाते. या मंदिराच्या शेजारी ओढा आहे. या ओढ्या पासून दीड तासाच्या अंतरावर वासोटा किल्ला आहे.
साताऱ्यामधून सुद्धा वासोटा या किल्ल्यावरती जाता येते. यासाठी आपल्याला वाघाली देवाची या गावी यावे लागते. या गावाच्या शेजारीच जलाशय आहे. हा जलाशय पार करून खिरकंडी या गावी यावे लागते. या खिरकंडी गावामधून धनगर वाडी कडे वाट जाते. धनगर वाडी पासून जाणारी वाट मेट इंदवली या गावात घेऊन जाते. साताऱ्यामधून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात.
महाबळेश्वर मधून सुद्धा वासोटा किल्ल्यावर जाता येते. या वाटे मध्ये घनदाट जंगल आहे. या जंगला मध्ये दोन वाटा आहेत. त्यापेकी एक उजवी कडे जाणारी वाट नागेश्वर मंदिराकडे जाते. तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर किल्ल्यावर जाते.
चिपळूणहून या गावामधून सुद्धा वासोटा किल्यावरती जाता येते. त्यासाठी पर्यटकांना महाराष्ट्र शासनाच्या बसने चोरवणे या गावी यावे लागते. येथून ४ ते ५ तासाचा उभा चढ चढून नागेश्वरला पोहोचता येते. (या मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा भरपूर साठा घेऊन जावे.) या वाटेने वर गेल्यावर एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वरकडे तर उजवीकडची वाट वासोटा किल्ल्यावरती जाते.
Vasota Fort Architecture | वासोटा किल्ल्याची वास्तुरचना
वासोटा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४२५० फूट उंचीवर आहे आणि तो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला “वनदुर्ग” असेही म्हटले जाते. वासोटा किल्ल्याची वास्तुरचना ही त्याच्या नैसर्गिक संरक्षणावर आधारित असून, तो अत्यंत डोंगराळ आणि दाट अरण्यांनी वेढलेला आहे.
किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा नैसर्गिक खडकांमध्ये कोरलेला असून तो अत्यंत अरुंद आहे, ज्यामुळे शत्रूला थेट प्रवेश करणे कठीण होते. प्रवेशद्वाराजवळच मोठी तटबंदी आणि पहारेकऱ्यांसाठी बांधलेली मचाणे दिसतात. वासोटा किल्ला हा प्रामुख्याने दगडी बांधकामावर आधारित आहे; येथे बांधकामासाठी स्थानिक दगडांचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्याच्या भिंतींच्या बांधकामात चुन्याचा वापर कमी प्रमाणात झाला असून नैसर्गिक खडकांचा आधार घेतला आहे.
किल्ल्यावर अनेक अवशेष आजही पाहायला मिळतात. त्यात काही मंदिरे, तोफांचे तळ, पाण्याचे टाके आणि निवासासाठीच्या जागा आहेत. येथे महादेव मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. हे मंदिर साध्या परंतु मजबूत दगडी बांधकामात केलेले असून छतावर कोरीव कामाचे काही अंश आजही दिसतात. किल्ल्यावर अनेक ठिकाणी पाण्याची टाकी कोरून तयार केलेली आहेत, ज्यामुळे पावसाळ्यानंतर वर्षभर पाण्याची सोय उपलब्ध आहे. हि जलव्यवस्था वासोट्याच्या वास्तुरचनेतील एक महत्त्वाचा भाग आहे.
किल्ल्याच्या माथ्यावरून कोयना धरण, नवरेगड आणि आसपासचे डोंगर दिसतात. त्यामुळे हा किल्ला पहारेकऱ्यांसाठी रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. वास्तुरचनेत संरक्षणावर विशेष भर दिलेला दिसतो नैसर्गिक उंची, दाट जंगल, अरुंद वाटा आणि मजबूत तटबंदी यामुळे वासोटा सहज जिंकता येत नव्हता.
राहाण्याची सोय
वासोटा – नागेश्वर ही दोनही ठिकाणे कोयना अभयरण्यात असल्यामुळे रात्री राहण्यासाठी परवानगी नाही. तरी अडचणीच्या वेळेला खालील ठिकाणी मुक्काम करता येईल.
१) वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते.
२) वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
३) नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.
जेवणाची सोय
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी लागते. कारण अभयारण्य क्षेत्र असल्याने आग पेटवण्यास परवानगी नाही.
पाण्याची सोय
वासोट्या वरील जोड टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.





