वजराई धबधबा | Vajrai Waterfall Information In Marathi

महाराष्ट्रामधील वजराई धबधबा हा सातारा जिल्ह्यातील भांबवली या गावाजवळ वसलेला आहे. महाराष्ट्रामधील सर्वात उंच धबधब्यांपेकी एक आहे. या वजराई धबधब्याचा संभोतालचा हिरागार निसर्ग धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण पर्यटक निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी आवडते ठिकाण बनले आहे. वजराई धबधब्याचा पावसाळ्यामध्ये प्रवाह वाढल्याने त्याचे सोंदर्य अधिक खुलून दिसते.वाजराई धबधबा हा सातारा परिसरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

कसे जायचे?

रेल्वेने 

वजराई धबधब्या पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा या ठिकाणी आहे. या सातारा रेल्वे पासून वजराई बधबा हा सातारा या शहरा पासून २७.३ किलोमीटर अंतरावर आहे. सातारा रेल्वे स्टेशन पासून आपल्याला टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने सुद्धा जाऊ शकतो. 

पुण्याहून कसे जायचे?

पुण्यापासून वजराई धबधबा हा सुमारे १४८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून वजराई धबधबा पाहण्यासाठी कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

शिवापुर → नरसापुर  → खंडाळा  → सातारा  → कास रोड  → भांबवली  → वजराई धबधबा 

मुंबईहून कसे जायचे?

मुंबईहून वजराई धबधबा हा सुमारे २९६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई हून वजराई धबधबा पाहण्यासाठी कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

मुंबई → लोणावळा → तळेगाव दाभाडे → शिरवळ → सातारा →  कास रोड  → भांबवली  → वजराई धबधबा 

भेट देण्यासाठी सर्वात्तम काळ 

जून ते ऑक्टोबर 

या महिन्यांमध्ये वजराई धबधबा या ठिकाणी पाऊस असतो. यामुळे हे महिने वजराई धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत. 

नोव्हेंबेर ते फेब्रुवारी 

या महिन्यांमध्ये वजराई धबधब्याच्या थिंकणी थंडी असते. 

मार्च ते मे 

या महिन्यांमध्ये वजराई धबधब्याच्या ठिकाणी भरपूर ऊन असते. त्यामुळे या महिन्यांमध्ये वजराई धबधब्याला भेट देऊ नये. 

वजराई धबधब्याच्या जवळचे पर्यटन स्थळे 

कास पठार 

महाराष्ट्रामधील कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये असून ते सातारा पासून सुमारे २४.२ किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्री पर्वत रांगेमध्ये १२०० मीटर उंचीवर वसलेले हे पठार फुलांचे पठार म्हणून ओळखले जाते. कास पठारावर निसर्गाचे अनोखे सौंदर्य पाहायला मिळते. लाल, गुलाबी, पांढरे, निळे आणि जांभळ्या रंगांच्या फुलांनी संपूर्ण पठार रंगीबेरंगी गालिच्यासारखे दिसते. त्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, फोटोग्राफर साठी  आणि पर्यटकांसाठी स्वर्गासारखे मानले जाते.

२०१२ साली कास पठाराला युनेस्को जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. येथे पर्यावरण संवर्धनासाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात येतो, जेणेकरून दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण होऊ शकेल.

कास पठाराजवळ वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा आणि कण्हेर धरण यांसारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे सातारा परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी कास पठार ही एक अवश्य भेट द्यावी अशी जागा आहे.

ठोसेघर धबधबा 

ठोसेघर धबधबा हा महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये असून ते एक निसर्गरम्य आणि अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे.ठोसेघर धबधबा हा सह्याद्री पर्वत रांगेमध्ये ठोसेघर गावाजवळ वसलेला आहे. सातारा शहरा पासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. 

ठोसेघर धबधबा हा एकच धबधबा नसून अनेक लहान-मोठ्या धबधब्यांची मालिका आहे. उंच कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी, आजूबाजूची हिरवीगार डोंगररांग आणि धुक्याने भरलेले वातावरण यामुळे येथे निसर्गाचे अत्यंत सुंदर दृश्य पाहायला मिळते. विशेषतः पावसाळ्यात हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. 

कण्हेर धरण

कण्हेर धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हे धरण कण्हेर नदीवर बांधले असून सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले आहे. सातारा शहरापासून जवळ असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत ये-जा असते.

कण्हेर धरणाचे मुख्य उद्दिष्ट पाणी साठवण आणि सिंचन आहे, परंतु आज ते एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, शांत पाणी आणि आजूबाजूची हिरवीगार डोंगररांग यामुळे येथे अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात धरण पूर्ण भरलेले असते आणि त्या वेळी परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

येथे पर्यटक कुटुंबासोबत पिकनिक, फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. सकाळच्या वेळी धरण परिसरात पसरलेले धुके आणि शांत वातावरण मनाला प्रसन्नता देते. पक्षी निरीक्षणासाठी हि  हे ठिकाण चांगले मानले जाते.

Scroll to Top