रंधा धबधबा | Randha Waterfall Information In Marathi

महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरामध्ये रंधा धबधबा वसलेला आहे. रंधा धबधबा हा प्रवरा नदीवरील धबधबा हा सुमारे १७० फुट उंची वरुन खोल दरीमद्धे कोसळतो. रंधा धबधबा हा सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीमद्धे वसलेला आहे. पावसाळ्यामध्ये रंधा धबधब्याचा पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढतो. धबधब्याच्या परिसरात घनदाट हिरवाई, डोंगररांगा आणि शांत वातावरण अनुभवता येते.

येथे पर्यटकांसाठी सुरक्षित व्ह्यूपॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे, जिथून धबधब्याचे सुंदर दृश्य पाहता येते. रंधा धबधबा हा भंडारदरा धरण, आर्थर लेक आणि कळसुबाई शिखर यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणांना एकत्र भेट देतात.फोटोग्राफर, निसर्गप्रेमी आणि कुटुंबासोबत फिरणाऱ्यांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरते.

How do I get there? | कसे जायचे?

रेल्वेने 

रंधा धबधब्या पासून जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी या ठिकाणी असून ते रंधा धबधब्यापासून सुमारे ४३.९ किलोमीटर अंतरावर आहे. या इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी, ऑटो आणि प्रायवेट गाडीने सुद्धा जाऊ शकतो. 

रस्त्याने 

पुण्याहून कसे जायचे?

पुणे → राजगुरूनगर →  मंचर →  रंधा वॉटरफॉल 

मुंबई हून कसे जायचे?

मुंबई → आमणे → इंदोरे → भंडारदरा 

रंधा धबधब्यावर जाण्यासाठी सर्वात्तम काळ 

जून ते ऑगस्ट 

या महिन्यांमध्ये रंधा धबधब्याच्या पर इसार यामध्ये पाऊस असतो. तसेच रंधा धबधब्याचा पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढलेला असतो. त्यामुळेच हे महिने रंधा धबधब्यावरती जाण्यासाठी सर्वात्तम आहेत. 

सप्टेंबेर ते फेब्रुवारी

हे महिन्यांमध्ये रंधा धबधब्याच्या परिसरामध्ये थंडी असते. 

मार्च ते मे 

या महिन्यांमध्ये रंधा धबधब्यावरती कडक ऊन असते, तसेच धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी झालेला असतो. 

Tourist places near Randha Falls | रंधा धबधब्याच्या जवळील पर्यटन स्थळे 

भंडारदरा धरण

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगामद्धे वसलेले भंडारदरा धरण हे पुण्यापासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर आणि मुंबई पासून सुमारे १७४ किलोमीटर अंतरावर आहे.प्रवरा नदीवर बांधलेले हे धरण  त्याच्या अप्रतिम सौंदर्या सोबतच त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि आसपासच्या अनेक आकर्षक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. भंडारदरा धरणाची निर्मिती १९१० मध्ये झाली असून, हे भारतातील सर्वात प्राचीन मातीच्या धरणांपैकी एक आहे. 

ब्रिटिश अभियंता विल्सन यांनी या धरणाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली, त्यामुळेच याला विल्सन डॅम असेही म्हणतात.या धरणाच्या बांधकामामुळे प्रवरा नदीवरील जलसाठ्याचे नियमन करणे शक्य झाले आणि परिसरातील शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी ते उपयुक्त ठरले. हे धरण त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचे उदाहरण आहे.

कळसुबाई शिखर 

महाराष्ट्रामधील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखराची उंची सुमारे १६४६ मीटर म्हणजे ५४०० फुट एवढी आहे. हे काळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटाच्या रांगा मध्ये वसलेले आहे. काळसुबाई शिखर हे महाराष्ट्रामधील महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.

कळसूबाई हे केवळ ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. या शिखराचं नाव, कळसूबाई नावाच्या एका स्थानिक मुलीवरून पडलं, जी गावकऱ्यांना कायम मदत करत असे. तिच्या अचानक गायब झाल्यानंतर, तिच्या स्मरणार्थ शिखरावर एक मंदिर बांधण्यात आलं, जे आजही भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात इथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. 

FAQ

रंधा धबधबा कुठे आहे?

महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरामध्ये रंधा धबधबा वसलेला आहे.

रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे?

प्रवरा नदीवर रंधा धबधबा आहे.

रंधा धबधब्यावर प्रवेश शुल्क आहे का?

काही ठराविक नाममात्र प्रवेश किंवा शुल्क लागू होते.

Scroll to Top