मराठी ट्रॅव्हलआपला प्रवास, आपल्या भाषेत

अवघड ट्रेक आणि किल्ले

लांबचा, खडा चढ. ट्रेकचा अनुभव, चांगले बूट आणि भरपूर पाणी हवं.

15 ठिकाणं

क्रम

किल्ले

राजगड किल्ला गडांचा राजा. सुमारे २५ वर्षं स्वराज्याची राजधानी. राजगड (पूर्वीचा वेल्हे) तालुका, पुणे जिल्हा
तोरणा किल्ला वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी जिंकलेला पहिला गड. पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला. राजगड (पूर्वीचा वेल्हे) तालुका, पुणे जिल्हा
जीवधन किल्ला दोन हजार वर्षांपूर्वी नाणेघाटाच्या व्यापारी वाटेवर नजर ठेवणारा गड. जुन्नर तालुका, पुणे जिल्हा
भैरवगड (कोयना) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात हरवलेला, कोकणावर नजर ठेवणारा गड. पाटण तालुका, सातारा जिल्हा (सातारा-रत्नागिरी सीमेवर)
वासोटा किल्ला शिवसागर जलाशयातून बोटीने, घनदाट जंगलातून जाणारा व्याघ्रगड. जावळी तालुका, सातारा जिल्हा
गोरखगड जंगलातून चढून कातळात कोरलेल्या दरवाजातून आत, मग जवळजवळ उभ्या पायऱ्यांनी सुळक्यावर: शेजारी मच्छिंद्रगड. मुरबाड तालुका, ठाणे
प्रबळगड शेजारी कलावंतिणीचा शंकूसारखा सुळका; पनवेलजवळचा थरारक ट्रेक. पनवेल तालुका, रायगड जिल्हा
माहुली किल्ला पळसगड आणि भंडारगडसह तीन गडांचं संकुल; सुळक्यांमधून चढणारा ठाण्याचा गड. शहापूर तालुका, ठाणे जिल्हा
लिंगाणा किल्ला रायगडसमोर उभा, सरळसोट सुळक्यासारखा किल्ला: स्वराज्याचा तुरुंग, आणि सह्याद्रीतली सगळ्यात कठीण चढाई. महाड तालुका, रायगड
साल्हेर किल्ला कळसूबाईनंतरचं दुसरं उंच शिखर, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला, आणि १६७२ च्या साल्हेरच्या लढाईची रणभूमी. बागलाण (सटाणा) तालुका, नाशिक
हरिहर किल्ला कड्यात कोरलेल्या, जवळपास उभ्या पायऱ्या: महाराष्ट्रातला सगळ्यात थरारक किल्ला. त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक जिल्हा

धबधबे

कातळधार धबधबा कातळाच्या मोठ्या खोबणीतून कोसळणारा, राजमाचीच्या जंगलातला धबधबा. मावळ तालुका, पुणे

साहसी खेळ आणि ॲक्टिव्हिटी

सांधण दरी दोन कातळभिंतींच्या मधली अरुंद, खोल दरी: सूर्यप्रकाशही नीट न पोहोचणारी 'व्हॅली ऑफ शॅडोज'. अकोले तालुका, अहिल्यानगर

तुमचं आवडतं ठिकाण इथे नाही?

नाव आणि काही फोटो WhatsApp वर पाठवा. आम्ही माहिती चेक करून नवीन पान बनवू, तुमच्या नावासकट.

WhatsApp वर सुचवा

App म्हणून Save करा

  1. खाली (किंवा वर) Share बटणावर टॅप करा.
  2. यादीत खाली स्क्रोल करून Add to Home Screen निवडा.
  3. वर उजवीकडे Add दाबा. होम स्क्रीनवर मराठी ट्रॅव्हलचा आयकॉन येईल.