कोकण मधील पावसाळी पर्यटनाचा सुंदर अनुभव जाणून घ्या. हिरवेगार डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य ठिकाणांसह मान्सूनमध्ये भेट द्यायची सर्वोत्तम ठिकाणे, प्रवास टिप्स आणि कोकणातील खास आकर्षणे या ब्लॉगमध्ये पाहा.
Amboli | आंबोळी
महाराष्ट्राच्या कोकण मधील आंबोळी हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून ते पुण्यापासून सुमारे ३८६ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ४८० किलोमीटर अंतरावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते. वर्षभर भरपूर पाऊस पडत असल्यामुळे येथे हिरवाई, धुके आणि सुंदर धबधबे पाहायला मिळतात.
आंबोळी मधील प्रमुख आकर्षण
- आंबोळी धबधबा
- आंबोळी सनसेट पॉइंट
- महादेवगड पॉइंट
- हिरण्यकेशी मंदिर
- कवळेशेत पॉइंट
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ
जून ते सेप्टेंबर
या महिन्यांमध्ये आंबोली या ठिकानामधील धबधब्यांचा आणि हिरवाईचा आनंद घेता येतो.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी
या महिन्यांमध्ये आंबोळी या ठिकाणी थंडी असते.
विशेष टिप
पावसाळ्यात आंबोलीमध्ये दाट धुके आणि जोरदार पाऊस असतो. त्यामुळे रेनकोट, छत्री आणि चांगली ग्रिप असलेले शूज सोबत ठेवावेत.
आंबोली हे निसर्गप्रेमी, फोटोग्राफर आणि शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी कोकणातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
Ganpatipule | गणपतीपुळे
गणपतीपुळे हे कोकणातील अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनारी वसलेले हे ठिकाण आपल्या निसर्गसौंदर्यासोबतच स्वयंभू गणपती मंदिरासाठी ओळखले जाते. येथे येणारे भाविक आणि पर्यटक दोघेही निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवतात.
गणपतीपुळे समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य आहे. निळाशार समुद्र, नारळ-पोफळीच्या बागा आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा यामुळे हे ठिकाण मनाला शांतता देणारे आहे. पावसाळ्यात येथे समुद्र अधिक रौद्र रूप धारण करतो आणि निसर्गाचे वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते.
गणपतीपुळे मंदिर हे स्वयंभू गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या गणपतीला “पश्चिमद्वारदेवता” असेही म्हटले जाते. हजारो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे.
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ
पावसाळा (जून ते सप्टेंबर)
या महिन्यांमध्ये निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. तसेच या महिन्यांमध्ये अत्यंत सुंदर फोटो येतात.
हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)
हे महिने गणपतीपुळेला जाण्यासाठी सर्वात्तम आहेत.
उन्हाळा (मार्च ते मे)
या महिन्यांमध्ये गणपतीपुळे या ठिकाणी अजिबात जाऊ नये.
Marleshwar Temple and Dhabdhaba | मार्लेश्वर मंदिर व धबधबा
मार्लेश्वर मंदिर हे कोकणातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे. संगमेश्वर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर निसर्गसौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. येथे जाण्यासाठी डोंगरातून उतराव्या लागणाऱ्या पायऱ्या आणि हिरवागार परिसर पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतो.
या मंदिराच्या जवळच असलेला धबधबा पावसाळ्यात विशेष आकर्षण ठरतो. मुसळधार पावसात डोंगरातून कोसळणारे पाणी, दाट धुके आणि सभोवतालची हिरवाई यामुळे संपूर्ण परिसर अत्यंत मनमोहक दिसतो. धबधब्याचा आवाज आणि थंड वारा यामुळे येथे शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होते.
मार्लेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून येथे असलेली गुहा आणि शिवलिंग भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
पावसाळ्यात येथे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण पायऱ्या घसरड्या असतात. योग्य पादत्राणे आणि सुरक्षिततेची काळजी घेतल्यास हा प्रवास अधिक आनंददायी होतो.
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ
पावसाळा (जून ते सेप्टेंबर)
या महिन्यांमध्ये धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो. तसेच हे महिने मार्लेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत.
हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)
या महिन्यांमध्ये मार्लेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर थंडी असते.
उन्हाळा (मार्च ते मे )
या महिन्यांमध्ये भरपूर ऊन असते. या महिन्यांमध्ये मार्लेश्वर मंदिराला अजिबात भेट देऊ नये.
Savatkada Dhabadhba | सावतकडा धबधबा
सावतकडा धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरातील एक सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा आहे. कोकणातील लपलेल्या पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो.
सह्याद्री पर्वतरांगांमधून उंचावरून कोसळणारा हा धबधबा पावसाळ्यात अत्यंत भव्य रूप धारण करतो. धबधब्याच्या परिसरात दाट जंगल, हिरवागार निसर्ग आणि थंडगार वातावरण असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांतता आणि ताजेपणाचा अनुभव मिळतो. पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण होणारा नाद आणि सभोवतालची नैसर्गिक सुंदरता मनाला भुरळ घालते.
सावतकडा धबधबा हे ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीची आवड असलेल्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे अनेक छोटे प्रवाह आणि ओढे निर्माण होतात, ज्यामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच वाढते. छायाचित्रकारांसाठीही हे ठिकाण स्वर्गासमान मानले जाते.
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ
जून ते सेप्टेंबर
या महिन्यांमध्ये धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो.
ऑक्टोबर ते नोव्हेंबर
या महिन्यांमध्ये भरपूर थंडी असते.
Aare-Vare Beach | आरे-वारे बीच
आरे-वारे बीच हा रत्नागिरीजवळील कोकणातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. रत्नागिरी शहरापासून सुमारे १२ ते १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा आपल्या स्वच्छ वाळू, निळ्याशार समुद्र आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
आरे आणि वारे अशी दोन लहान गावे या परिसरात असल्यामुळे या किनाऱ्याला आरे-वारे बीच असे नाव पडले आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा वळणावळणाचा घाटरस्ता आणि उंच डोंगरावरून दिसणारे समुद्राचे सुंदर दृश्य पर्यटकांना मोहून टाकते. विशेषतः आरे-वारे पॉइंटवरून दिसणारा अरबी समुद्र आणि किनारपट्टीचा नजारा अतिशय आकर्षक असतो.
पावसाळ्यात येथे हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा पाहायला मिळतात. हिवाळ्यात हवामान आल्हाददायक असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारणे, सूर्यास्त पाहणे आणि फोटोग्राफी करणे याचा विशेष आनंद घेता येतो.
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ
जून ते सेप्टेंबर
हिरवाई आणि पावसाळी निसर्ग अनुभवण्यासाठी हे महिने अनुकूल आहेत.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी
हे महिने समुद्रकिनारा आणी पर्यटनासाठी सर्वात उत्तम आहेत.
FAQ
पावसाळ्यात कोकण पर्यटनासाठी का प्रसिद्ध आहे?
पावसाळ्यात कोकण हिरवाईने नटतो, धबधबे प्रवाहित होतात आणि सह्याद्री पर्वतरांगा धुक्याने वेढल्या जातात. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हा काळ सर्वात आकर्षक मानला जातो.
पावसाळ्यात कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ कोणते?
आंबोली हे पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाण मानले जाते. येथे धबधबे, धुके आणि हिरवाईचा अप्रतिम अनुभव मिळतो.
पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांना भेट देता येते का?
होय, पण समुद्रात उतरताना काळजी घ्यावी. आरे-वारे बीच, गणपतीपुळे बीच आणि तारकर्ली बीच येथे निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.
कोकणात पावसाळ्यात किती दिवसांची सहल योग्य आहे?
साधारण ३ ते ५ दिवसांची सहल कोकणातील प्रमुख स्थळे पाहण्यासाठी पुरेशी असते.
पावसाळ्यात कोकणातील सर्वात सुंदर निसर्गदृश्य कुठे पाहायला मिळते?
आंबोली, महादेवगड पॉइंट आणि आरे-वारे बीच येथे पावसाळ्यातील सर्वात सुंदर निसर्गदृश्यांचा अनुभव घेता येतो.
