कोकण हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन प्रदेशांपैकी एक मानला जातो. निळाशार समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरे आणि स्वादिष्ट कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक कोकण दर्शनासाठी भेट देतात. जर तुम्हाला कमी नियोजनात आणि आरामदायी पद्धतीने कोकण फिरायचे असेल, तर कोकण दर्शन टूर पॅकेज हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
What is the Konkan Darshan package? | कोकण दर्शन पॅकेज म्हणजे काय?
कोकण दर्शन पॅकेज हे पर्यटन कंपन्या किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) यांच्याकडून आयोजित केलेले टूर पॅकेज असते. या पॅकेजमध्ये प्रवास, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन आणि मार्गदर्शक यांचा समावेश असतो. त्यामुळे पर्यटकांना स्वतंत्रपणे हॉटेल, वाहन किंवा पर्यटन स्थळांचे नियोजन करण्याची गरज पडत नाही.
Ganpatipule and the idol of Lord Ganesha | गणपतीपुळे आणि गणेशाची मूर्ती
महाराष्ट्राच्या कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे सर्वात लोकप्रिय धार्मिक आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गणपतीपुळे या ठिकाणी असलेले स्वयंभू गणपती मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा यांमुळे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात. हे ठिकाण समुद्र, डोंगर आणि अध्यात्म यांचे सुंदर संगम मानले जाते.
गणपतीपुळे येथील गणेशमूर्ती स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली आहे असे मानले जाते. हि गणेशाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि त्याला पश्चिम द्वार देवता असेही म्हंटले जाते. अनेक शतकांपासून भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. मंदिराच्या मागील टेकडीची प्रदक्षिणा करण्याची परंपरा असून सुमारे १ किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग भक्तांसाठी विशेष आकर्षण आहे.
मंदिराच्या अगदी समोर पसरलेला गणपतीपुळे बीच हा महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. सोनेरी-रुपेरी वाळू, स्वच्छ पाणी आणि समुद्रकिनाऱ्यालगतचे हिरवेगार डोंगर यामुळे या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सूर्यास्ताच्या वेळी समुद्रावर पडणारी सोनेरी किरणे पर्यटकांना आकर्षित करतात.
गणपतीपुळे येथे दर्शनाबरोबरच समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका, फोटोग्राफी, स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि जवळील पर्यटनस्थळांना भेट देता येते. जवळच मालगुंड, आरे-वारे बीच आणि जयगड किल्ला यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा गणपतीपुळे भेटीसाठी सर्वोत्तम कालावधी मानला जातो.
Ratnagiri City | रत्नागिरी शहर
महाराष्ट्रामधील कोकणामद्धे रत्नागिरी हे शहर असून ते ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या समृद्ध शहर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. कोकण दर्शन पॅकेजमध्ये रत्नागिरी शहर दर्शन हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
रत्नागिरी शहरामधील रत्नदुर्ग हा किल्ला पर्यटकांच्या आवडीचा किल्ला आहे. या किल्ल्यामधील भगवती मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे थिबा पॅलेस. ब्रह्मदेशाचे (म्यानमार) शेवटचे राजा थिबाव मिन यांना ब्रिटीशांनी येथे नजरकैदेत ठेवले होते. या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
रत्नागिरी हे शहर हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध आहे. उन्हाळायच्या हंगामामद्धे आपल्याला हापूस आंबा चाखायला मिळतो, तसेच कोकणी खाद्य संस्कृती आस्वाद घेण्याची संधि मिळते. शहर दर्शनादरम्यान पर्यटकांना समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आणि स्थानिक बाजारपेठांचा अनुभव घेता येतो. शांत वातावरण, स्वच्छ परिसर आणि कोकणातील नैसर्गिक सौंदर्य यामुळे रत्नागिरी शहर पर्यटकांच्या मनात कायमची छाप सोडते.
Jaigad Fort | जयगड किल्ला
महाराष्ट्राच्या कोकण मधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड किल्ला आहे. हा जयगड हा किल्ला भव्य सागरी किल्ला असून तो शास्त्री नदी आणि अरबी समुद्राच्या काठावर वसलेला आहे. किल्ल्याच्या परिसरात प्राचीन विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि काही ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याजवळील दीपगृह (लाइटहाऊस) देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. येथून समुद्रकिनाऱ्याचे अत्यंत सुंदर दृश्य पहायला मिळते. जयगड किल्ल्यापासून काही अंतरावर प्रसिद्ध गणपतीपुळे येथील गणेशाचे मंदिर आणि गणपतीपुळे बीच आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक गणपतीपुळे दर्शनासोबत जयगड किल्ल्यालाही भेट देतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा जयगड किल्ला पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
Tarkarli Beach | तारकर्ली बीच
महाराष्ट्राच्या कोकणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्ली बीच असून तो स्वछ निळेशार समुद्र पांढरी वाळू आणि शांत वातावरण यांमुळेच तारकर्लीला महाराष्ट्रातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र मानले जाते. तारकर्ली बीच हा वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. जसे की, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, पॅरासेलिंग, जेट स्की आणि बोटिंग यांसारख्या विविध साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो.
समुद्रातील स्वच्छ पाण्यामुळे रंगीबेरंगी मासे, प्रवाळ आणि सागरी जीवसृष्टी जवळून पाहण्याची अनोखी संधी मिळते. तारकर्लीचा सूर्यास्त हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असतो.
संध्याकाळच्या वेळी समुद्रावर पडणारी सोनेरी किरणे आणि किनाऱ्यावर वाहणारा थंडगार वारा मन प्रसन्न करतो. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते.
The Devbagh Confluence | देवबागचा संगम
महाराष्ट्राच्या कोकणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवबाग संगम हे मालवणजवळ वसलेले एक अत्यंत निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. येथे करली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होत असल्यामुळे या ठिकाणाला देवबाग संगम असे नाव पडले आहे.
निळाशार समुद्र, शांत नदी आणि हिरव्यागार नारळी-पोफळीच्या बागा यांमुळे हे ठिकाण पर्यटकांना विशेष आकर्षित करते. देवबाग संगम हे तारकर्ली पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. येथे बोटिंग, डॉल्फिन सफारी, जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग आणि इतर जलक्रीडांचा आनंद घेता येतो.
समुद्रात बोटीतून फेरफटका मारताना डॉल्फिन पाहण्याचा आनंद पर्यटकांना मिळतो. संगम परिसरातील शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य मनाला वेगळाच आनंद देते. सकाळच्या वेळी उगवता सूर्य आणि संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. छायाचित्रणाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण अतिशय आकर्षक आहे.
देवबाग येथे स्थानिक मालवणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. ताजे सीफूड, सोलकढी आणि पारंपरिक कोकणी पदार्थ पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. स्थानिक लोकांचे आदरातिथ्य आणि शांत जीवनशैली कोकण संस्कृतीची ओळख करून देते.
Sindhudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ला
महाराष्ट्राच्या कोकणा मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला असून तो अरबी समुद्राच्या कुरते बेटावर वसलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे. या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कोकण किनारपट्टीचे संरक्षण आणि समुद्री व्यापारावर नियंत्रण ठेवणे.
सिंधुदुर्ग किल्ल्याची रचना अत्यंत मजबूत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्ल्याभोवती भक्कम दगडी तटबंदी असून सुमारे ४० फूट उंच आणि अनेक किलोमीटर लांबीची भिंत समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करते. या किल्ल्यात एकूण ४२ बुरुज आहेत, जे शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी बांधले गेले होते.
किल्ल्याच्या आत प्राचीन मंदिरांचे अवशेष आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही आहे, जे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे आजही शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. सिंधुदुर्ग किल्ला मालवण शहरापासून जवळ असल्याने येथे बोटीद्वारे पोहोचता येते. बोटीचा प्रवास स्वतःमध्येच एक सुंदर अनुभव असतो, कारण समुद्रातील निळेशार पाणी आणि किल्ल्याचे दूरून दिसणारे भव्य रूप मन मोहून टाकते.
Malvan | मालवण
महाराष्ट्राच्या कोकणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण हे प्रसिद्ध किनारी शहर असून कोकणातील पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. अरबी समुद्राच्या काठावर वसलेले हे शहर आपल्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक स्थळांसाठी आणि खास मालवणी खाद्यसंस्कृतीसाठी ओळखले जाते.
मालवणचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला असून तो भव्य सागरी किल्ला समुद्राच्या मधोमध बेटावर वसलेला आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो.
मालवण परिसरात तारकर्ली बीच आणि देवबाग संगम हे प्रसिद्ध ठिकाणे जवळच आहेत. त्यामुळे मालवण हे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, जेट स्की, पॅरासेलिंग यांसारख्या जलक्रीडांसाठीही ओळखले जाते. या शहरात स्थानिक मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय आहे.
सकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर रंगीबेरंगी मासेमारी बोटी आणि बाजारातील ताजे मासे पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. ऑक्टोबर ते मार्च हा मालवण भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान थंड आणि आनंददायक असते, ज्यामुळे समुद्रकिनाऱ्याचा पूर्ण आनंद घेता येतो.
Kunkeshwar Temple | कुणकेश्वर मंदिर
कुणकेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोकण मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. कुणकेश्वर मंदिर हे प्राची शिवमंदिर असून त्याला दक्षिण काशी असेही म्हणतात. अरबी समुद्राच्या निळ्याशार किनाऱ्यावर उभे असलेले हे मंदिर भाविकांना आणि पर्यटकांना एकाच वेळी अध्यात्म आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव देते. कुणकेश्वर मंदिराची स्थापत्यशैली आकर्षक असून मंदिरावर सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते. मंदिरातील शिवलिंग स्वयंभू मानले जाते आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. या उत्सवासाठी महाराष्ट्रासह देशभरातून हजारो भाविक येथे येतात.
मंदिरासमोर विस्तीर्ण समुद्रकिनारा असून समुद्राच्या लाटा आणि मंदिरातील घंटानाद यांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अत्यंत सुंदर दिसते. त्यामुळे हे ठिकाण फोटोग्राफी साठीही प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर मंदिराला भेट देताना पर्यटक जवळील देवबाग, देवगड किल्ला आणि देवगड दीपगृहालाही भेट देतात. तसेच या परिसरात प्रसिद्ध देवगड हापूस आंब्यांच्या बागाही पाहता येतात.
Velneshwar Beach | वेळनेश्वर बीच
वेळनेश्वर बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात वसलेला एक सुंदर, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे. कोकणातील इतर गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे तुलनेने कमी गर्दी असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि शांत वातावरणाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक आदर्श ठिकाण मानले जाते.
वेळणेश्वर बीच सुमारे १.५ किलोमीटर लांब असून त्याच्या किनाऱ्यावर शुभ्र वाळू आणि नारळी-पोफळीच्या घनदाट बागा पाहायला मिळतात. समुद्राच्या निळ्याशार लाटा आणि किनाऱ्यालगतची हिरवाई यामुळे येथील परिसर अत्यंत सुंदर दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
या समुद्रकिनाऱ्याजवळच प्रसिद्ध वेळनेश्वर शिव मंदिर आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या प्राचीन मंदिराला धार्मिक महत्त्व असून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे वेळणेश्वर हे धार्मिक आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.
वेळणेश्वर बीचवर फेरफटका मारणे, समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेणे, फोटोग्राफी करणे आणि स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटकांसाठी आनंददायी अनुभव असतो. येथील शांत वातावरण शहरातील धकाधकीपासून दूर काही क्षण निवांत घालवण्याची संधी देते. ऑक्टोबर ते मार्च हा वेळणेश्वर भेटीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
Harihareshwar | हरीहरेश्वर
महाराष्ट्राच्या कोकणमधील रायगड जिल्ह्यामध्ये हरीहरेश्वर हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे हरीहरेश्वर धार्मिक स्थळ दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखे जाते. समुद्र किनारा प्राचीन मंदिरे आणि शांत वातावरण यांमुळे हरिहरेश्वर हे कोकणातील अत्यंत लोकप्रिय पर्यटन केंद्र बनले आहे.
येथील मुख्य आकर्षण म्हणजे हरीहरेश्वर मंदिर. हे प्राचीन मंदिर भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांना समर्पित आहे. मंदिराचे धार्मिक महत्त्व खूप मोठे असून वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. मंदिर परिसरातील वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे.
हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे. समुद्राच्या लाटा, किनाऱ्यावरील मऊ वाळू आणि सभोवतालचे हिरवेगार डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य विशेष सुंदर दिसते.
त्यामुळे फोटोग्राफी साठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरची प्रदक्षिणा (परिक्रमा) हा येथील एक विशेष धार्मिक अनुभव मानला जातो. समुद्रकिनाऱ्यालगत आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या मार्गावरून चालताना निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवता येते. भरतीच्या वेळेचा अंदाज घेऊनच ही प्रदक्षिणा करावी. हरिहरेश्वरच्या आसपास श्रीवर्धन देवबाग बीच आणि बंकोट किल्ला यांसारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे पर्यटक एकाच प्रवासात अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकतात. ऑक्टोबर ते मार्च हा हरिहरेश्वर भेटीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
Shrivardhan | श्रीवर्धन
श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर समुद्रकिनारी शहर असून कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. स्वच्छ समुद्रकिनारा, ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे आणि शांत वातावरण यांमुळे श्रीवर्धन पर्यटकांना विशेष आकर्षित करते. पेशवा घराण्याचे मूळ गाव म्हणूनही या शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रीवर्धनमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. विशेषतः लक्ष्मी-नारायण मंदिर हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. तसेच पेशव्यांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांमुळे इतिहासप्रेमींनाही येथे भरपूर माहिती मिळते.
श्रीवर्धनच्या आसपास हरीहरेश्वर दिवेआगार आणि बंकोट किल्ला यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे एकाच प्रवासात अनेक आकर्षक ठिकाणांना भेट देता येते.
येथील स्थानिक कोकणी खाद्यसंस्कृतीही पर्यटकांना आकर्षित करते. ताजे सीफूड, सोलकढी आणि पारंपरिक कोकणी पदार्थांचा आस्वाद येथे घेता येतो. नारळ, सुपारी आणि आंब्यांच्या बागांनी वेढलेला परिसर कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याची संधी देतो.
ऑक्टोबर ते मार्च हा श्रीवर्धन भेटीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असल्यामुळे समुद्रकिनाऱ्याचा आणि पर्यटनस्थळांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो.
Devgad and Devgad Fort | देवगड आणि देवगड किल्ला
देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर किनारी शहर असून आपल्या प्रसिद्ध हापूस आंब्यांसाठी, निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक वारशासाठी ओळखले जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर कोकणातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. शांत वातावरण, स्वच्छ किनारे आणि हिरवागार परिसर यामुळे पर्यटकांना येथे विशेष आकर्षण वाटते.
देवगडचे मुख्य आकर्षण म्हणजे देवगड किल्ला. समुद्रकिनाऱ्यालगत उभारलेला हा ऐतिहासिक किल्ला मराठा काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. किल्ल्याच्या तटबंदीवरून अरबी समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य पाहायला मिळते. इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला विशेष महत्त्वाचा आहे.
देवगड किल्ल्याजवळच प्रसिद्ध दीपगृह (लाइटहाऊस) आहे. या दीपगृहावरून समुद्रकिनारा, बंदर आणि परिसरातील निसर्गसौंदर्याचे अप्रतिम दृश्य दिसते. छायाचित्रणाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरते.
देवगड हे जगप्रसिद्ध हापूस आंब्यांचे माहेरघर मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात आंब्यांच्या बागांनी संपूर्ण परिसर बहरून जातो. त्यामुळे अनेक पर्यटक देवगडला खास आंबा पर्यटनासाठी भेट देतात.
देवगडच्या आसपास कुंकेश्वर मंदिर, विजयदुर्ग किल्ला आणि अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे एकाच प्रवासात धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा आनंद घेता येतो.
ऑक्टोबर ते मार्च हा देवगड भेटीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असल्यामुळे किल्ला, समुद्रकिनारे आणि इतर पर्यटनस्थळे आरामात पाहता येतात.
What is included in the package? | पॅकेजमध्ये काय समाविष्ट असते?
बहुतेक कोकण दर्शन पॅकेजमध्ये खालील सुविधा दिल्या जातात:
निवास व्यवस्था
पर्यटकांसाठी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. MTDC च्या पॅकेजमध्ये MTDC रिसॉर्टमध्ये मुक्काम दिला जातो.
भोजन
सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये समाविष्ट असू शकते. काही पॅकेजमध्ये सर्व जेवणाची सुविधा दिली जाते.
वाहतूक
एसी बस, टेम्पो ट्रॅव्हलर किंवा कारद्वारे स्थानिक पर्यटनाची व्यवस्था केली जाते.
पर्यटन स्थळ दर्शन
पॅकेजमध्ये नमूद केलेल्या सर्व ठिकाणांचे दर्शन घडवले जाते.
टूर गाईड
स्थानिक इतिहास आणि पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शकाची सुविधा उपलब्ध असते.
How much does the Konkan Darshan package cost? | कोकण दर्शन पॅकेजची किंमत किती असते?
पॅकेजचा कालावधी, हॉटेलचा दर्जा आणि पर्यटन स्थळांनुसार किंमत बदलते.
| पॅकेज | कालावधी | अंदाजे किंमत रुपायांमद्धे |
| हरिहारेश्वर टूर | ३ दिवस | ४३५० |
| गणपतीपुळे टूर | २-३ दिवस | ४३५० ते ७८५० |
| कुंकेश्वर टूर | २ दिवस | ४६५० पासून |
| तारकर्ली – कुंकेश्वर टूर | ४ दिवस | ५८०० पासून |
| गणपतीपुळे – वेळनेश्वर टूर | ४ दिवस | ५८०० पासून |
| कोकण रिव्हिएरा टूर | ६ दिवस | ८७०० पासून |
The best time to visit Konkan | कोकण दर्शनासाठी सर्वोत्तम काळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी
हा कोकण फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. हवामान आल्हाददायक असते आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद घेता येतो.
मार्च ते मे
उन्हाळ्यात कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यांचा आस्वाद घेता येतो.
जून ते सप्टेंबर
पावसाळ्यात कोकण हिरवागार होतो. धबधबे, घाट आणि निसर्गसौंदर्य अप्रतिम दिसते. मात्र काही जलक्रीडा बंद असू शकतात.
पॅकेज कुठून बुक करावे?
MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ)
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत विविध कोकण पर्यटन पॅकेज उपलब्ध आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून चौकशी आणि बुकिंग करता येते. MTDC Tours & Packages
खाजगी पर्यटन संस्था
अनेक ट्रॅव्हल एजन्सी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूर येथून कोकण दर्शन टूर आयोजित करतात. त्यांच्याकडे गट टूर तसेच वैयक्तिक (Customized) पॅकेज उपलब्ध असतात.
ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्स
पर्यटक ऑनलाइन टूर बुकिंग वेबसाइट्सद्वारे देखील कोकण दर्शन पॅकेज निवडू शकतात.
कोकण दर्शन पॅकेजचे फायदे
संपूर्ण प्रवासाचे नियोजन तयार मिळते.
हॉटेल व वाहन शोधण्याची गरज राहत नाही.
कुटुंबासोबत आरामदायी प्रवास करता येतो.
खर्च आधीच निश्चित असल्यामुळे बजेट नियंत्रणात राहते.
अनुभवी मार्गदर्शकांमुळे पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध होतो.
कोकण दर्शन पॅकेजची सरासरी किंमत किती असते?
पॅकेजनुसार किंमत बदलते. साधारणपणे ३ ते ५ दिवसांच्या टूरसाठी प्रति व्यक्ती सहा हजार रुपये ते वीस हजार रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.
पॅकेजची किंमत कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते?
प्रवासाचा कालावधी, हॉटेलचा दर्जा, वाहतुकीचा प्रकार, जेवणाची व्यवस्था आणि पर्यटनस्थळांची संख्या यावर किंमत अवलंबून असते.
कोकण दर्शन पॅकेजमध्ये कोणती पर्यटनस्थळे समाविष्ट असतात?
गणपतीपुळे, रत्नागिरी, मालवण, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला, देवगड, सावंतवाडी, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन यांसारखी ठिकाणे समाविष्ट असतात.
गणपतीपुळे, तारकर्ली आणि मालवण यांचा पॅकेजमध्ये समावेश असतो का?
होय, बहुतेक लोकप्रिय कोकण पॅकेजमध्ये हि ठिकाणे समाविष्ट असतात.
पॅकेजमध्ये हॉटेल निवासाची सुविधा दिली जाते का?
होय, बहुतांश पॅकेजमध्ये हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहण्याची सुविधा दिली जाते.
